‘ग्रामीण भागात लसीकरणाविषयी बरेच गैरसमज’

पिंपरी : करोनामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याची मागणी सातत्याने होत आहे. मोठय़ा प्रमाणात आणि वेगाने लसीकरण झाल्यास निर्बंध मागे घेता येऊ शकतील, असे आरोग्यमंत्री राजेश पाटील यांनी निगडीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील, असे सांगून ग्रामीण भागात लसीकरणाबाबत असणारे अनेक गैरसमज दूर करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आयुर्वेद रुग्णालय व स्टर्लिग रुग्णालयाच्या वतीने निगडी प्राधिकरणात आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन टोपे यांच्या हस्ते झाले. आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पालिका आयुक्त राजेश पाटील, प्राचार्य रागिणी पाटील आदी उपस्थित होते. टोपे म्हणाले की, लस म्हणजे एकप्रकारचे कवच आहे. आपले अर्थचक्र चालू ठेवायचे असल्यास जास्तीत जास्त लसीकरण होणे आवश्यक आहे. वेगाने लसीकरण होण्यासाठी केंद्र सरकारने अधिकाधिक लशी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. महाराष्ट्रात करोनाची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे केंद्राने महाराष्ट्राला झुकते माप दिले पाहिजे. त्या दृष्टीने राज्य शासनाच्या वतीने केंद्राकडे विनंती करणार आहोत.