महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२०चा अंतिम निकाल आणि शिफारस यादी जाहीर करण्यात आली. निकालात रोहित कट्टे यांनी सर्वसाधारण प्रवर्गातून राज्यात पहिला क्रमांक पटकावला. तर पवन नाईक यांनी मागासवर्ग प्रवर्गातून, कीर्ती कुंजीर यांनी महिला प्रवर्गातून पहिला क्रमांक मिळवला.

एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे निकालाची माहिती दिली. ९ ते १३ मे आणि २३ ते २७ मे या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या होत्या. पाच संवर्गातील २१७ पदांपैकी २१५ उमेदवारांची शिफारस करण्यात आली. निकाल आणि प्रत्येक प्रवर्गासाठीचे पात्रता गुणही जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या औरंगाबद खंडपीठाच्या आदेशानुसार दोन उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आला. शिफारसपात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणांची पडताळणी करायची असल्यास उमेदवारांनी निकाल त्यांच्या ऑनलाइन खात्यात पाठवल्याच्या दहा दिवसांत आयोगाकडे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक असल्याचे एमपीएससीने नमूद केले.

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Gokhale Institute Pune
मतदार जागृतीच्या फलकावर ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘नोटा’; पुण्यातील गोखले संस्थेतील घटना
pune set exam marathi news, set exam registration marathi news
‘सेट’ परीक्षेसाठी उमेदवार नोंदणीत वाढ; पारंपरिक पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा

शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या अर्जातील विविध आरक्षणविषयक दाव्यांच्या अनुषंगाने त्यांनी मुलाखतीवेळी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची वैधता सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत तपासणी करून उमेदवारांना संबंधित पदावर नियुक्ती देण्यात येईल. उमेदवारांनी अर्जात दिलेली माहिती खोटी किंवा चुकीची आढळून आल्यास किंवा अर्जातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीच्या वेळी न केल्यास आणि अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. न्यायालयात किंवा न्यायाधीकरणात दाखल विविध न्यायिक प्रकरणांतील अंतिम न्यायनिर्णयाच्या, आरक्षणासंदर्भात प्रकरणपरत्वे शासनाकडून होणाऱ्या कार्यवाहीच्या अधीन राहून निकाल जाहीर करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.