हडपसर भागात रिक्षाचालकाला बेदम मारहाण करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर राहुल गायकवाड (वय २४, रा. लक्ष्मी माता मंदिराजवळ, हडपसर) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

हेही वाचा- पिंपरी: फ्लॅट खरेदीत महिलेची एक कोटींची फसवणूक ; हिंजवडीत १३ जणांवर गुन्हा दाखल

किरकोळ कारणावरून खून केल्याचा आरोप

या प्रकरणी कृष्णा विठ्ठल रेखले (वय २७, रा. कवडीपाट टोल नाका, लोणी काळभोर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षदा प्रतीक वाघमारे (वय २२, रा. शांतीनगर वसाहत, हडपसर) हिने या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गायकवाड आणि रेखले रिक्षाचालक आहेत. रविवारी सकाळी लोणी काळभोर परिसरात दोघांचा किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. त्यानंतर रेखलेने गायकवाडला दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. नारळाच्या बागेजवळ त्याला दांडक्याने बेदम मारहाण करुन त्याचा खून करण्यात आला.

पोलिसांकडून एक जण ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गायकवाड मृतावस्थेत सापडल्याची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. त्यानंतर पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, हडपसर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी रेखले याला ताब्यात घेण्यात आले आहे.