पुणे : गेल्या काही दिवसांत माझ्याकडे काही फाइल्स आल्या आहेत. सध्याच्या सरकारमधील गैरव्यवहारांबाबत तपास यंत्रणेतील अधिकाऱ्याने तयार केलेल्या त्या फाइल्स असाव्यात असे वाटते. त्यात भाजप, अजित पवार गटातील काही नेते आणि एकनाथ शिंदे यांच्या गटातील काही नेत्यांच्या गैरव्यवहारांची प्रकरणे असल्याचे दिसूून येत आहे, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. आता ही प्रकरणे कधी बाहेर आणायची याबाबत लवकरच निर्णय घेणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी रोहित पवार बोलत होते.

माझ्याकडे आलेल्या फाइल्समध्ये काही गंभीर प्रकरणे असल्याचे दिसून येत आहे. मोठे गैरव्यवहार झाले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या फाइल्सची विधी तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येत आहे. स्वच्छता, रुग्णवाहिका, साखर कारखाने या संदर्भातील प्रकरणे त्यात आहेत. तपास यंत्रणांंना ही प्रकरणे बाहेर यावीत असे वाटत असावे म्हणून या फाइल्स माझ्याकडे आल्या असाव्यात, असे पवार यांनी सांगितले. मात्र, ज्या नेत्यांशी संबंधित ही प्रकरणे आहेत, त्या नेत्यांची नावे पवार यांनी घेतली नाहीत.

हेही वाचा >>>‘कसली रे कोयता गँग, यांचा सुपडाच साफ करतो’; अजित पवारांची पुण्यातील गुन्हेगारांना तंबी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार यांच्यावर टीका करत रोहित पवार म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत आपल्या नेत्यांना तिकीट मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्लीला जावे लागत आहे. यापूर्वी शरद पवार हे निर्णय घेत होते. मात्र, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या समर्थक नेत्यांना पुरेशी तिकिटे मिळणार नाहीत. विधानसभा निवडणुकीवेळी त्यांची परिस्थिती आणखी वाईट होणार आहे.