Rupali Patil Thombare on Ravindra Dhangekar : पुण्यात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरदाव वेगाने पोर्श कार चालवत एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक तरुण आणि एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर काही तासांनी आरोपीला जामिनावर मुक्त करण्यात आलं. त्यामुळे राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर या प्रकरणावरून पोलीस प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न करत आहेत. ते सातत्याने गृह विभाग, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत आहेत. दरम्यान, आमदार धंगेकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हात पाय बांधून पळायला लावलं आहे, अशी टीका केली होती. धंगेकरांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रुपाली ठोंबरे यांनी फेसबूकवर यासंदर्भात एक पोस्ट लिहून धंगेकरांना राजकारण न करता पुण्यासाठी काम करण्याचं आवाहन केलं आहे.

रुपाली ठोंबरे यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आमदार रवींद्र धंगेकरजी, देवेंद्र फडवणीस यांनी अजित पवारांचे हातपाय बांधले, असं तुम्ही बोलून गेलात पण तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की हे तेच अजित पवार आहेत, जे महविकास आघाडीमध्ये असताना ज्यांनी तुमच्या आमदारकीसाठी हातपाय झटकून, तन, मन, धनाने जोरात काम केलं, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जोमात काम करायला सांगितलं. अजित पवार हे सुशिक्षित, प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले, कर्तव्यदक्ष आणि काम करणारे नेते आहेत. आता अजित पवार हे महायुतीत आहेत हाच तुमचा त्रास आहे.

Aryan Dev Neekhra pune porsche crash accident
“ते लोक माझा खून…”, पुणे अपघातावरून रॅप करणाऱ्या आर्यनचा कारवाईनंतर आणखी एक व्हिडीओ व्हायरल
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Hamas men confess
“माझ्या वडिलांनी आधी बलात्कार केला, मग मी आणि…”, हमासच्या बाप-लेकाचे इस्रायली महिलेशी राक्षसी कृत्य
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
chhagan bhujbal narendra modi
भाजपाच्या ‘४०० पार’च्या घोषणेचा निवडणुकीत फटका बसला? भुजबळांची जाहीर कबुली; मोदींचा उल्लेख करत म्हणाले…

रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे की, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आहेत. तर अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. पुण्यात एका अल्पवयीन मुलाकडून मद्यधुंद अवस्थेत हा अपघात घडला त्यात दोन तरुण मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, भयाण आणि धक्कादायक घटनेनं पुणं हादरलं आहे. त्यात खुद्द त्या खात्याच्या प्रमुखाने, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तालयात जाऊन कडक कारवाईचे आदेश दिले, कर्तव्यात कसूर केलेल्या पोलिसांना निलंबित केले. महायुतीचे सरकार असल्याने अजित पवार आणि देवेंद्र फडवणीस यांच्यातील समन्वय, संवाद, एकत्र काम करण्याची दोघांची शैली तुम्ही पाहताय. याच्या तुम्हाला अधिक वेदना होत आहेत याची आम्हाला जाणीव आहे.

हे ही वाचा >> “ते लोक माझा खून…”, पुणे अपघातावरून रॅप करणाऱ्या आर्यनचा कारवाईनंतर आणखी एक व्हिडीओ व्हायरल

रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे की, गृहमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले म्हणजे पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून एकत्रितपणे हा निर्णय घेतलेला असतो. तो तुम्हाला समजत नसेल किंवा समजूनसुद्धा फक्त विरोधक आहात म्हणून तुम्ही घडलेली घटना, गुन्हा न समजता विरोधक म्हणून केवळ टीका करत आहात. चांगले लोकप्रतिनिधी बनून आपलं पुणं, आपली युवा पिढी वाचवूया आणि घडवूया. नुसते राजकीय स्टंट नकोत. त्यामुळे कामाची दिशा भरकटत जाते. रवींद्र धंगेकरजी तुम्ही केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध.