Pune Porsche Crash : पुण्यातील कल्याणीनगर भागात १९ मे रोजी भरधाव पोर्श कारने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन संगणक अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा त्यावेळी ही पोर्श कार चालवत होता. अपघातानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. मात्र अवघ्या काही तासांनी त्याला जामिनावर सोडण्यात आलं. त्यामुळे राज्यभरातून संतापाची लाट उसळली. दरम्यान, या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या चेहऱ्याशी थोडंफार साम्य असलेल्या तरुणाने एक रॅप साँग बनवून सोशल मीडियावर शेअर केलं. हे गाणं खूप व्हायरलही झालं. त्यामुळे अनेकांना वाटलं की, हाच आरोपी असून तो स्वतःच्या कृत्याचं समर्थन करतोय. त्यामुळे या घटनेबद्दल आणखी चीड निर्माण झाली होती. अशातच हे रॅप साँग गाणाऱ्या तरुणाविरोधात सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आर्यन देव नीखरा असं या सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरचं नाव असून त्याने पुणे अपघात प्रकरणाशी संबंधित व्हिडीओ बनवला होता. या गाण्यामुळे लोकांमध्ये आणखी चीड निर्माण झाली होती. अखेर अल्पवयीन आरोपीच्या आईला हा तिचा मुलगा नसल्याचं जाहीर करावं लागलं होतं. तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीदेखील पत्रकार परिषदेत सांगितलं की, हा फेक व्हिडीओ आहे. त्याचबरोबर आर्यनविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ आणि भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम ५०९, २९४ ब या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Confusion over CrowdStrike company Falcon Sensor software update
प्रतीक्षा, खोळंबा, अपरिहार्यता! संगणकीय व्यवस्थेतील एका दोषाने जगभर गोंधळ
Microsoft, microsoft outage,
विश्लेषण : एका ‘मायक्रोसॉफ्ट’मुळे जग का कोलमडले? ‘क्राऊडस्ट्राइक’ बिघाड काय होता?
Microsoft Outage Hilarious memes take over X amid global IT glitch
डॉली चायवाला-बिल गेट्सच्या भेटीमुळे ‘Microsoft Down?; सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा महापूर
Viral Video: Nagpur Man Drives Car While Kissing Girlfriend Seated On His Lap
Nagpur Car Video: सीए तरुण अन् इंजिनिअर गर्लफ्रेंडचे धावत्या कारमध्ये अश्लील चाळे; नागपुरातला धक्कादायक प्रकार
spice jet woman slaps cisf person on jaipur airport
SpiceJet च्या महिला कर्मचाऱ्याने CISF अधिकाऱ्याला कानशि‍लात लगावली; धक्कादायक Video व्हायरल!
Loksatta kutuhal Mark Zuckerberg Facebook founder and CEO of Meta Platforms Company
कुतूहल: मार्क झकरबर्ग
Bareli Home Guard Controls Traffic With His Unique Dance Moves
बरेलीच्या रस्त्यावर होम गार्ड डान्स स्टेप्सच्या मदतीने करतोय वाहतूक नियंत्रण, VIDEO एकदा पाहाच
Bull hits Pakistani reporter during live TV
टीव्हीवर लाईव्ह बातम्या सांगत होती पाकिस्तानी महिला पत्रकार, तेवढ्यात बैलाने…..; Video होतोय तुफान Viral

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्यनने आणखी एक व्हिडीओ जारी करून प्रशासनावरील संताप व्यक्त केला आहे. “मूळ प्रकरणावरून सर्वांचं लक्ष हटवण्यासाठी माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे”, असं आर्यनने म्हटलं आहे. “मी कोणालाही शिवीगाळ केली नव्हती, मी एक सामान्य माणूस असल्यामुळे माझ्यावर ही कारवाई करण्यात आली आहे”, असंही तो म्हणाला.

हे ही वाचा >> “पंतप्रधान मोदींनी हिमाचल प्रदेशमधील सरकार पाडण्याचं खुलं आव्हान दिलं”, राहुल गांधींचा दावा

आर्यन नीखराने म्हटलं आहे, “त्या लोकांनी माझ्यावर कलम ४१ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच कलम ५९ आणि २९४ ही कलमंदेखील लावली आहेत. यामागे त्यांचं एकमेव उद्दिष्ट आहे, ते म्हणजे मूळ प्रकरणावरून लक्ष हटवून सर्व लाईमलाईट माझ्यावर यावी. त्यांनी असं केलं कारण तो (अल्पवयीन आरोपी) एक कोट्यधीशाचा मुलगा आहे आणि मी एक मध्यमवर्गीय तरुण आहे. ते लोक माझा खून करू शकतात. कारण माझ्या आयुष्याची काहीच किंमत नाही. मला एवढंच सांगायचं आहे की मी दोन व्हिडीओ शेअर केले होते आणि या दोन्ही व्हिडीओंमध्ये मी कोणालाही आई किंवा बहिणीवरून शिवी दिली नव्हती. मी केवळ महिलांसाठी आवाज उठवला होता. मी कोणाबद्दलही काहीच वाईट बोललो नव्हतो. मी केवळ शाब्दिक कोटी करण्याचा प्रयत्न केला होता. मी कुठल्याही व्यक्तीचं नाव घेतलं नव्हतं. मी एक पॅरोडी रॅप बनवलं होतं.”