धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद यासाठी कडक कायदे करावेत. त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा.या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने हिंदू जन आक्रोश मोर्चाला लाल महाल येथून सुरवात झाली आहे.हा मोर्चा डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत असणार आहे.

हेही वाचा- राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेस चिंचवड पोटनिवडणूक लढवणार; महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता

आमदार शिवेंद्र राजे भोसले, आमदार भीमराव तापकीर,तेलंगणाचे आमदार राजा भैया ठाकूर, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, मिलिंद एकबोटे,निवृत्त पोलीस अधिकारी भानू प्रताप बर्गे हे सहभागी झाले आहेत. लाल महाल येथून ११ वाजण्याच्या सुमारास मोर्चाला सुरवात झाल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून लक्ष्मी रोडने हा मोर्चा डेक्कन परिसरातील धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पोहोचणार आहे. शहरातील विविध राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळे या मोर्चात सहभागी झाले आहेत.

हेही वाचा- पुणे : हिंदू जनआक्रोश मोर्चानिमित्त मध्यभागातील वाहतुकीत बदल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

होय मी धर्मवीरच !, गो हत्या मुक्त पुणे, फाल्गुन अमावस्या अर्थात धर्मवीर दिन,लव जिहाद मुक्त पुणे असे फलक घेऊन विविध हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत.