संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चाचे पुणे जिल्हा समन्वयक आणि राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संघटक शरद पोखरकर यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. यामध्ये पोखरकर यांना गंभीर जखमा झाल्या आहेत त्यांच्या पाठीवरही मारहाणीचे वळ उमटले आहेत. याप्रकरणी ५० कार्यकर्त्यांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चौघांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पोखरकर हे दरवर्षी कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचे मोफत वाटप करतात. यावर्षी ते अवसरी खुर्द येथील शाळेत पुस्तकांच्या प्रति ते वाटणार होते.
याविषयी त्यांचे शाळेच्या मुख्याध्यापकांशीही बोलणे झाले होते. मात्र हे पुस्तक चांगले नाही असे म्हणत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गावातील नागरिकांनी या पुस्तक वाटपाला विरोध दर्शवला. या पुस्तकात शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी आहे त्यामुळे हे पुस्तक वाटले जाऊ नये अशी भूमिका घेण्यात आली त्याचमुळे या पुस्तक वाटपाला विरोधही करण्यात आला.

Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप
shivaji adhalarao patil, amol kolhe
अमोल कोल्हेंचे ‘ते’ विधान बालिशपणा अन् अज्ञानातून; शिवाजी आढळरावांचा टोला
virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
Rohit Pawar Post Against Raj Thackeray
“तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक’ असं..”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यावर रोहित पवारांची पोस्ट

बजरंग दलाच्या पन्नास कार्यकर्त्यांनी शिवजयंतीच्या दिवशी तुम्ही हे पुस्तक का वाटत आहात असा प्रश्न पोखरकर यांना विचारला. त्यानंतर या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोखरकरांमध्ये वाद झाला. वादानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोखरकर यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर चारजणांना न्यायालयात हजर करण्यात आले त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक घाडगे अधिक तपास करत आहेत.