राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत संयुक्त प्रसाद मित्र मंडळ प्रथम

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला.

राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत संयुक्त प्रसाद मित्र मंडळ प्रथम
संग्रहित छायाचित्र

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. धनकवडी येथील आदर्श मित्र मंडळाला जय गणेश भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

सुभाषनगर माडीवाले वसाहत गणेशोत्सव मंडळाने द्वितीय, लष्कर परिसरातील श्रीकृष्ण तरुण मंडळाने तृतीय, नाना पेठेतील काळभैरवनाथ तरुण मंडळाने चौथे तर बुधवार पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या १६२ मंडळांपैकी ११२ मंडळांनी पारितोषिके मिळविली आहेत. गणेश कला क्रीडा मंच येथे रविवारी (१४ ऑगस्ट) राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात मंडळांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त हेमंत रासने यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण या वेळी उपस्थित होते.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Samyukt prasad mitra mandal first national ganeshotsav competition pune print news ysh

Next Story
पुणे : संतसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॅा. वसुंधरा बनहट्टी यांचे निधन
फोटो गॅलरी