आळंदी: संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात पार पडला. तीन दिवसांपासून अलंकापुरी आळंदीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी दाखल झाले आहेत. ग्यानबा तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम या जयघोषाने आणि टाळ मृदंगाच्या गजरात अवघी आळंदी दुमदुमून गेली. मुख्य मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.

हेही वाचा : किवळेतील दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा बेकायदा होर्डिंग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सकाळी माऊलींच्या समाधीवर दुग्धआरती व अभिषेक करण्यात आला. संत नामदेव महाराजांच्या हस्ते किर्तन सेवा देण्यात आली. यावेळी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरावर फुलांची सजावट करण्यात आली होती. योगी, तपस्वी, समाधिस्त माऊली या ओळी नुसार माऊलींचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने संपन्न झाला. अलंकापुरी आळंदीत उपस्थित वारकरी हळवे झाल्याचे पाहायला मिळाले. फुलांची उधळण करत माऊलींना निरोप देण्यात आला. सकाळी नऊ ते बाराच्या दरम्यान ह.भ.प नामदेव महाराजांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन झाले. मग, घंटानाद, पुष्पवृष्टी आणि आरती करण्यात आली. या सोहळ्यासाठी आलेल्या शेतकरी वारकऱ्यांनी महायुतीकडून अनेक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव मिळावा अशी मागणी वारकऱ्यांनी सरकारकडे केली आहे.