शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयातील प्रमुख जिल्हा न्यायाधीशाचा पदभार एस. सी. चांडक यांनी नुकताच स्वीकारला. जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली आहे.न्यायाधीश चांडक यापूर्वी कोल्हापूर येथील जिल्हा न्यायालयात प्रमुख जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्यरत होते.न्यायाधीश चांडक यांनी १९९४ मध्ये विधी अभ्यासक्रम पूर्ण केला.

हेही वाचा >>>पुणे: मार्केट यार्डात मोटारीची काच फोडून लॅपटाॅप चोरला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर त्यांनी वकील व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्यांनी फेब्रुवारी २००२ ते मे २००८ पर्यंत ते अंजनगाव येथील प्रथमवर्ग न्यायालयात सहायक सरकारी वकील म्हणून काम पाहिले. मे २००८ मध्ये त्यांची मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी विविध न्यायालयात न्यायदानाची जबाबदारी पार पाडली.