पुणे : महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काल गुरुवारी (५ डिसेंबर) शपथ घेतली.त्यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांनी उपमुख्यमंत्री पदाची देखील शपथ घेतली. त्या शपथविधीनंतर आगामी कालावधीत महायुतीमधील नेत्यांना कोणतं मंत्रीपद किंवा कोणत्या नेत्यांची कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी वर्णी लागणार, यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र यामध्ये पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद अजित पवार की भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील या दोघांपैकी कोणाला दिले जाते. याकडे सर्वांचे लागून राहिले आहे.

आणखी वाचा-पुणे रेल्वे स्थानकात ज्येष्ठ, अपंग प्रवाशांची परवड ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याच दरम्यान पुण्यात एका कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधत अनेक राजकीय घडामोडी बाबत भाष्य केले. तुम्हाला पालकमंत्रीपद मिळावे अशी मागणी कार्यकर्ते करीत आहेत. त्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, कार्यकर्त्यांचं काय तर नेता देखील आपल्याला अधिकाधिक चांगलं मिळावं,अशी इच्छा व्यक्त करीत असतो. परंतु आपल्या सगळ्याच इच्छा पूर्ण होत नसतात. ज्यावेळी अनेक सहयोगी पक्ष सोबत घेऊन जायचं असतं, त्यावेळी नेहमीच समजूतदारपणा दाखवायचा असतो. भविष्यामध्ये काय दडलं आहे. याबद्दल मला माहिती नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.