सहा आसनी रिक्षातून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून चोरट्याने चार लाख २० हजारांचे दागिने लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ज्येष्ठ महिलेची बहीण कात्रज भागात राहायला आहे. बहिणीकडे धार्मिक कार्यक्रम असल्याने तक्रारदार ज्येष्ठ महिलेने दागिने घेतले होते. कात्रजहून त्या सहा आसनी रिक्षातून वारजेकडे येत होत्या. प्रवासात ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून चोरट्याने दागिने लांबविले. वारजे चौकात त्या रिक्षातून उतरल्या. तेव्हा त्यांनी पिशवीची पाहणी केली. पिशवीतून दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक अमोल सावंत तपास करत आहेत. रिक्षा प्रवासात दागिने लांबविण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior woman rickshaw ride incident in warje area jewelry pune print news amy
First published on: 20-05-2022 at 16:30 IST