पुणे : हडपसर भागातील एका नामांकित बँकेतील वरिष्ठ व्यवस्थापकाने कर्मचारी महिलेशी अश्लील कृत्य केले. महिलेने व्यवस्थापकास विरोध केल्याने तिची बदली करण्याची धमकी दिली. याप्रकरणी बँक व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हडपसर भागातील एका नामांकित बँकेत पीडित महिला कर्मचारी आहे. महिला बँकेत जात असताना व्यवस्थापकाने तिला अडवले. ‘तुमचे कपडे चांगले आहेत. आपण बँकेत न जाता हॉटेलमध्ये जाऊ,’ असे व्यवस्थापक तिला म्हणाला.

हेही वाचा >>> बोपदेव घाटात दुचाकी घसरुन सहप्रवासी तरुणाचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलेने त्याला नकार दिला. तिने त्याला बँकेत सोडण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तिला बँकेत सोडले. या घटनेची कोणाला माहिती दिल्यास तुझी बदली करेल, अशी धमकी त्याने तिला दिली. त्यानंतर त्याने महिलेला त्रास दिला. महिलेच्या कामात चुका काढून तिला त्रास दिला. त्यानंतर महिलेची हडपसर शाखेतून वारजे, मार्केट यार्ड शाखेत बदली केली. त्यानंतर तिची डेक्कन जिमखाना भागातील विभागीय कार्यालयात बदली केली. त्याच्या त्रासामुळे घाबरलेल्या महिलेने अखेर पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जौंजाळ तपास करत आहेत.