पिंपरी : पिंपरी-चिंचवड भाजपाच्या शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती केली.

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे १६ जानेवारी २०२० रोजी भाजपाच्या शहराध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली होती. त्यांचा शहराध्यक्षपदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपून सात महिने पूर्ण झाले. लांडगे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांना मुदतवाढ न देता शंकर जगताप यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. शंकर जगताप हे पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवक होते. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे शंकर हे बंधू आहेत.

Pune, Pune election, Campaigning in Pune
पुण्यात आज प्रचाराची रणधुमाळी; प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या जाहीर सभा
Mahayuti gathering in Washim, Gyayak Patni,
महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन् खुर्चीवरून वाद !
karan pawar marathi news, jalgaon lok sabha karan pawar marathi news
भाजपचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना पक्षप्रवेशानंतर लगेचच ठाकरे गटाची जळगावमधून उमेदवारी
bharti kamdi marathi news, bharti kamdi palghar latest news in marathi
जिल्हा परिषद अध्यक्ष भूषविलेल्या भारती कामडी यांच्यापुढे आता लोकसभेचे आव्हान

हेही वाचा – धोका वाढला! डेंग्यूमुळे पुण्यात वर्षातील पहिला बळी

हेही वाचा – पुणे : रुबी हॉल क्लिनिकमधील ‘किडनी रॅकेट’ प्रकरणी राज्य सरकारचा मोठा निर्णय

पोटनिवडणुकीत झालेला अन्याय दूर

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत प्रबळ दावेदार असतानाही शंकर जगताप यांना पक्षाने उमेदवारी दिली नव्हती. त्यांच्याऐवजी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शंकर यांच्यावर अन्याय झाला. शहराध्यक्षपद देऊन पोटनिवडणुकीत त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करावा, अशी एका गटाची मागणी होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगताप यांना शहराध्यक्ष करून अन्याय दूर केल्याची चर्चा भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आहे.