लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणारे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज जाहीर सभा होणार आहे. तर याच मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणूक लढविणारे साईनाथ बाबर यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले असून, त्यांची सभादेखील आजच या मतदारसंघात होणार आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…

पुण्यात झालेल्या कसबा आणि कोथरूड विधानसभा मतदार संघातील मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांच्या सभेमध्ये ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. जातीयवाद, द्वेषाचे राजकारण करून पवारांनी महाराष्ट्रातील एकोपा संपविला अशी टीका राज ठाकरे यांनी पवारांवर केली होती. त्यांच्या या टीकेला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील उत्तर दिले होते. आमच्या सरकारने तसेच माझ्या पक्षाने अनेक जाती धर्माच्या लोकांना संधी दिली. आजही आमचा दृष्टिकोन व्यापक आहे, मात्र कोणी मूर्खासारखं बोलत असेल तर त्याची नोंद कशासाठी घ्यायची? अशा शब्दात पवार यांनी राज ठाकरे यांना फटकारले होते.

आणखी वाचा-दमडीही खर्च न करता जिंकणारे लोकप्रतिनिधी

हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (शरद पवार), राष्ट्रवादी (अजित पवार), मनसे आणि अपक्ष अशी चौरंगी लढत होणार आहे. महायुतीच्या जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला सुटला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्यावर विश्वास दाखवून त्यांनाच उमेदवारी दिली आहे. महायुतीकडून चेतन तुपे, महाविकास आघाडीकडून प्रशांत जगताप, मनसेचे साईनाथ बाबर आणि अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्यामध्ये येथे लढत होत आहे. या मतदारसंघात चौरंगी लढत होत असल्यामुळे प्रचाराचा धुरळा उडला आहे. प्रचार फेऱ्या, पदयात्रा आणि रोड शो यामुळे प्रचारात रंगत आली आहे.

महाविकास आघाडीचे हडपसर मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ शरद पवार मैदानात उतरले असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षाचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या प्रचारासाठी आज या मतदारसंघात सभा घेणार असल्याने या दोन्ही नेत्यांच्या सभांकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचाराची सभा सायंकाळी सात वाजता माळवाडी येथील महापालिकेच्या नाट्यगृहासमोर होणार आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा सायंकाळी पाच वाजता वैभव थिएटरच्या मागे शाळा क्रमांक ३२ च्या समोरील रस्त्यावर होणार आहे.

आणखी वाचा-बालेकिल्ल्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’साठी प्रतिष्ठेची लढाई

खडकवासला मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके यांच्या प्रचारार्थ शरद पवार हे बालाजीनगर, धनकवडी येथे सभा घेणार आहेत. पाच वाजता ही सभा होईल. तर याच मतदारसंघातून निवडणूक लढवित असलेले मनसेचे उमेदवार मयुरेश वांजळे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची जाहीर सभा सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथील शिंदे मैदानावर होणार आहे. सायंकाळी सात वाजता ही सभा होईल. पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दोन्ही जाहीर सभा घेणार असल्याने या सभांमध्ये एकमेकांवर टीकेची झोड उठवित प्रत्युत्तर देणार का? याकडे लक्ष लागले आहे.

Story img Loader