पुणे : विधायक कामाला प्रोत्साहन देणारे यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब ठाकरे हे दोन नेते होऊन गेले. त्यांनी सामान्य कुटुंबातील माणसाला उभे केले. बाळासाहेब ठाकरे आणि आमची मैत्री होती. ठाकरे यांच्यामुळे सुप्रिया सुळे या पहिल्यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्या होत्या, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

मावळ लोकसभेचे पहिले खासदार दिवंगत गजानन बाबर यांच्या जीवन चरित्रावर आधारित संघर्षयात्री या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांच्या हस्ते सोमवारी चिंचवड येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील, डॉ.अमोल कोल्हे, ठाकरे गटाचे मावळचे संघटक संजोग वाघेरे यावेळी उपस्थित होते.

kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका
shashikant shinde
निष्ठा बदलली नाही म्हणून होणाऱ्या परिणामांना भीत नाही; शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा
Ganesh Naik-Subhash Bhoirs meeting is the beginning of new political equation
गणेश नाईक-सुभाष भोईर यांच्या भेटीच्या चर्चेने नव्या राजकीय समीकरणाची नांदी?

हेही वाचा >>>साताऱ्यात पन्नास ‘तुताऱ्यां’नी देवेंद्र फडणवीस गांगारले; संजय राऊतांच मिश्किल वक्तव्य

शरद पवार म्हणाले की, आमच्या पक्षाने सुप्रियाला राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे समजल्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी फोन करुन आपली मुलगी पहिल्यांदा संसदेत जात आहे. त्यामुळे आमचा उमेदवार नसेल असे सांगून सुप्रियाला बिनविरोध राज्यसभेत पाठविले. एवढा मोठा अंत:करणाचा मोठेपणा क्वचित बघायला मिळतो. तो ठाकरे यांच्यामध्ये होता.