पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सन  २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर पवार हे भाजपबरोबर जाणार नाहीत, याची खात्री काय? अशी  विचारणा वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक  प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यासंदर्भात केली. पवार यांची मैत्री काँग्रेसबरोबर असले तरी, निवडणुकीनंतर ते भाजप बरोबर असतील, असेही त्यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. अन्वर शेख यांच्या प्रचारार्थ आंबेडकर यांची सभा हडपसरमधील कन्यादान मंगल कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते.  शिरूरचे उमेदवार डॉ.अन्वर शेख, जिल्हाध्यक्ष राज कुमार, कमलेश उकरंडे यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>> पिंपरी: श्रीरंग बारणेंसाठी अभिनेता गोविंदा सरसावला! केला बारणेंचा प्रचार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपला सत्ता मिळाली तर, ते भारतीय राज्यघटना बदलतील असा आरोपही आंबडकर यांनी केला. ते म्हणाले, की देशभरातील मतदानाची घसरती टक्केवारी चिंतेचा विषय असून भाजपने नागरिकांचा अपेक्षाभंग केल्याने मतदानाचे प्रमाण घसरत आहे. राज्यात वंचित बहुजन आघाडीचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही पक्षाने मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली नाही. त्यावरून या पक्षाचा खरा चेहरा पुढे आला आहे.  स्मार्ट पुणे शहरात पाण्यासाठी पुरेसा पाणीपुरवठा करता येत नाही. निवडणुकीत वंचित पक्षाची ताकद वाढली आहे. तरूणांची संख्या देशात मोठी आहे. त्यांचे शिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगार गरजेचे आहेत, असे डॉ. अन्वर शेख यांनी सांगितले.