पत्नीच्या प्रियकराने पतीवर कोयत्याने वार केल्याची घटना संगमवाडी भागात घडली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी प्रियकरास येरवडा पोलिसांनी अटक केली.या प्रकरणी कानिफनाथ उर्फ कानक्या कोलार (वय ४० रा. गणपती मंदिराजवळ, संगमवाडी) याला अटक करण्यात आली. याबाबत एकाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण आणि आरोपी कोलार ओळखीचे आहेत. दोघे एकाच भागात राहायला आहेत.

हेही वाचा >>>पिंपरीः बेशिस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई ; महापालिका आयुक्तांचे आदेश

murder of girlfriend, mumbai,
मुंबई : प्रेयसीच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक
college girl commit suicide over love affair
प्रेमप्रकरणातून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या; बिबवेवाडीतील घटना
attack on college girl failed after the woman started screaming
शाब्बास! महिलेच्या प्रसंगावधानामुळे तरुणीवरील हल्ल्याचा प्रयत्न फसला…
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

तक्रारदाराचे पत्नीशी वाद झाले होते. त्याची पत्नी दोन वर्षे वेगळी राहत आहे. आरोपीचे तक्रारदाराच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. तक्रारदार रिक्षातून घरी निघाला होता. त्या वेळी संगमवाडी गावठाण परिसरात कोलारने रिक्षा अडवली. कोलारने त्याच्यावर कोयत्याने वार केले.या घटनेत तक्रारदार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सांगवीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयाने याबाबतची माहिती पोलिसांना कळविली. त्यानंतर कोलार याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील तपास करत आहेत.