पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर शिवशाही बसला भीषण आग लागली आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर बसने अचानक पेट घेतल्याने मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे. शिवशाही बसमध्ये १२ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. चालकाने प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवाशांना खाली उतरवले.

हेही वाचा – पिंपरी : इंद्रायणी नदी संवर्धन जागृतीसाठी ३५ हजार सायकलपटूंची रॅली

हेही वाचा – एटीएममधून रोकड काढणाऱ्या नागरिकांना लुटणारे परराज्यातील चोरटे गजाआड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. किंवा कोणीही जखमी झालेलं नाही. या घटनेमुळे काही वेळ मुंबईकडे जाणारी लेन वाहतुकीसाठी ठप्प झाली होती. अग्निशमन दलाने तात्काळ येऊन आग विझवली आहे. मुंबईच्या दिशेने वाहतूक पूर्ववत झाली आहे. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांना आग लागण्याच्या घटना वाढतच आहेत.