हप्ता न दिल्याने सराईत गुन्हेगारांनी किराणा माल दुकानदारावर चाकूने वार केल्याची घटना कोथरूड भागात घडली. या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिलीप चौधरी (वय ३२, रा. कोथरूड ) यांनी या संदर्भात अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोथरूड भागात दिलीप यांचे तुलसी सुपर शॉपी हे किराणा माल विक्रीचे दुकान आहे. रात्री नऊच्या सुमारास दिलीप दुकानात होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या सराईत गुन्हेगारांनी दिलीप यांच्याकडे पैशांची मागणी केली. दिलीपने नकार दिल्यानंतर आरोपींनी गल्ला उघडला. गल्ल्यातील रोकड लुटण्याच्या प्रयत्न केला. त्या वेळी दिलीप यांनी आरोपींना विरोध केला. तेव्हा त्यांच्यावर एका आरोपीने चाकूने वार केले. दुकानातील स्कॅनिंग यंत्र लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत सपताळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shopkeeper was attacked with a knife for non payment of installments in kothrud pune pune print news rdk 25 ssb
First published on: 22-01-2023 at 19:36 IST