पुणे : नुकतीच ६५ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडचा पराभव करत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. दरम्यान, यावर्षी महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार म्हणून सिकंदर शेखकडे सर्व जण पाहत होते. मात्र, सेमिफायनलमध्ये महेंद्र गायकवाडकडून सिकंदरला पराभव स्वीकारावा लागला. पराभवाचे शल्य असल्याचे सिकंदरने म्हटले असून, अन्याय झाल्याचे अप्रत्यक्षरीत्या त्याने मान्य करत नाराजी व्यक्त केली. पुढील महाराष्ट्र केसरी जिंकून दाखवेल, असेही सिकंदरने म्हटले आहे. तो पिंपरी-चिंचवडमध्ये आला होता. त्याच्याशी लोकसत्ता ऑनलाइनच्या प्रतिनिधीने संवाद साधला.

हेही वाचा – विश्लेषण : ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचे महत्त्व किती?

सिकंदर शेख म्हणाला की, सोशल मीडियावर माझ्याबद्दल प्रेम व्यक्त केले जात आहे. त्यांना वाटत होते की मी महाराष्ट्र केसरी व्हायला पाहिजे होते. पण, माझा पराभव झाल्याने त्यांना दुःख झालेले आहे. कुस्ती सर्वांना कळते, हा महाराष्ट्र छत्रपतींचा आहे. महाराष्ट्राच्या मातीत कुस्तीचे धडे दिले जातात. अन्याय झाला आहे की, नाही दिसून येते. पाठीमागून शूट केलेला जो व्हिडिओ समोर आला तो बघा. तो बघून तुम्ही ठरवा, मी यावर बोलणे योग्य नाही, अस म्हणत त्याने आपली नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा – “कदाचित अजून देखील मार्ग निघू शकतो”, सत्यजित तांबे प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझ्यावरील प्रेम कायम राहू द्या. पराभव झाल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते. अनेक जण मला येऊन भेटले. पुढील महाराष्ट्र केसरी जिंकून चाहत्यांच्या डोळ्यात आनंद पाहायचा आहे, असे सिकंदर म्हणाला. सिकंदरचे सेमिफायनलमधील प्रशिक्षक म्हणाले की, सिकंदरवर अन्याय झाला, असे माझे म्हणणे आहे. एक वर्षाची मेहनत पाण्यात गेली.