पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यंदा बारावीचा ९१. २५ टक्के लागला. मात्र निकाल जाहीर करणाऱ्या राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्या बाबतीत अनोखा योगायोग जुळून आला. गोसावी यांच्या मुलीनेही यंदा बारावीची परीक्षा दिली होती. त्यामुळे राज्य मंडळाचे अध्यक्ष आणि बारावीची परीक्षा दिलेल्या मुलीचे पालक अशा दुहेरी भूमिकेत गोसावी होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्या दुहेरी भूमिकेविषयी गोसावी म्हणाले, की राज्य मंडळ अध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी होती. पण वडील म्हणून आपल्या मुलीच्या निकालाविषयीची उत्सुकता होतीच. कारण करोनामुळे दहावीत असताना परीक्षा झाली नव्हती. यंदाच्या बारावीच्या परीक्षेसाठी सवलती देण्यात आलेल्या नव्हत्या. पण मुलीने प्रामाणिकपणे अभ्यास केला होता. जेईई परीक्षेत चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळतील अशी अपेक्षा होती. तिने केलेल्या अभ्यासाप्रमाणे तिला गुण मिळाले. त्यामुळे पालक म्हणून समाधानी आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State board president who announced the result of 12th pune print news ccp 14 ysh
First published on: 25-05-2023 at 20:47 IST