पुणे : परवाना असणाऱ्या वितरकांनाच नियमाप्रमाणे मद्य विक्री करता येते. तसेच, परवाना असलेल्या ठिकाणीच ग्राहकांना मद्य सेवन करता येते. मात्र, अवैध मद्यविक्री आणि अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या २९ जणांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने २९ पैकी २५ जणांना दोषी ठरवून त्यांना ३७ हजार रुपयांचा दंड केला आहे.

महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे ६८ आणि ८४ कलमानुसार, अवैध मद्य विक्री करणाऱ्यांविरुद्ध, तसेच अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात राज्य उत्पादन शुल्क विभागाने ७ ते ९ जानेवारी दरम्यान विशेष मोहीम राबवून २९ गुन्हे नोंदविले आहेत. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर २५ आरोपींना दोषी ठरविण्यात आले असून न्यायालयाकडून या आरोपींना एकूण ३७ हजार रुपये दंड करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली.

हेही वाचा – भारतीय डॉक्टरने विकसित केले तोंडाच्या कर्करोगावरील औषध, जागतिक स्तरावरील वैद्यकीय नियतकालिकांकडून दखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्यात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. पुणेकरांना अवैध मद्य निर्मिती, वाहतूक आणि विक्रीबाबत माहिती मिळाल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ आणि दूरध्वनी क्र. ०२०-२६०५८६३३ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी केले.