लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : घटस्फोटाच्या केसमध्ये महिलेला मदत करीत असल्याच्या कारणावरून एका महिलेने आपल्या दोन साथीदारांसह तरुणाच्या मोटारीवर दगड केली. ही घटना चिखलीतील साने चौकात घडली.

सिद्धेश सुरेश कापसे (वय २४, रा. नेवाळे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमनाथ अर्जुन गोंदवले, अथर्व सोमनाथ गोंदवले आणि महिला आरोपी (सर्व रा. नेवाळे वस्ती, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

आणखी वाचा-शत्रूनेही गौरविलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्वकीयांकडून होणारी उपेक्षा ही शोकांतिका – अपर्णा कुलकर्णी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश हे आरोपींच्या नातेवाईक महिलेला तिच्या पतीसोबत सुरू असलेल्या घटस्फोटाच्या केसमध्ये मदत करीत असल्याचा आरोपींना संशय होता. सिद्धेश हे आपले मित्र सागर बाळू थोरात, आकाश नानासाहेब थेंगल, आकाश अनिल जरकर यांच्यासह जेवण करण्यासाठी आपल्या मोटारीमधून रात्री साडेदहाच्या सुमारास चालले होते. साने चौकाजवळ सोमनाथ याने सिद्धेश यांच्या मोटारीला आडवी मोटार घालून थांबवली. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अथर्व आणि महिला आरोपी यांनी सिद्धेश यांच्या मोटारीवर पाठीमागून दगडफेक करत काच फोडली. हा दगड सिद्धेश यांच्या डाव्या हाताच्या मनगटाजवळ लागून जखम झाली. पोलीस हवालदार पेटकर तपास करीत आहेत.