बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांनी सोमवारी (१७ जून) पुकारलेला, व्यवस्थापनाविरुद्ध केलेल्या आरोपांसह देशव्यापी बंद मागे घेतला आहे. बँक व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणांना संघटनेने विरोध केल्याने कर्मचाऱ्यांवर सूडभावनेतून खोटय़ा तक्रारी आणि चौकशीचा ससेमिरा लावला जात असल्याचा आरोप करीत कर्मचारी संघटनेने १७ जून रोजी देशव्यापी बंद पुकारला होता. मात्र, हा बंद मागे घेण्यात आला असल्याचे  कळविण्यात आले आहे.