पिंपरी- चिंचवड शहरामध्ये शरद पवार यांची २० जुलैला भव्य सभा होणार आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक मोठ्या संख्येने प्रवेश करणार असल्याची माहिती शहरात पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी दिली. पिंपरीतील नवमहाराष्ट्र महाविद्यालयाच्या प्रांगणात या सभेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. वॉटरप्रूफ मंडप टाकला जात आहे.

हेही वाचा – बेकायदा बाळगलेले पिस्तूल हाताळताना गोळीबारात एकजण जखमी; सिंहगड रस्त्यावर वडगाव बुद्रुक भागातील घटना

हेही वाचा – सौंदर्य प्रसाधनाच्या खोक्यांतून गोव्यातील मद्याची तस्करी, एक कोटी २८ लाखांच्या मद्यसाठा जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिंपरी- चिंचवड शहरातील अजित पवारांची ताकद शरद पवार गट कमी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाचे माजी नगरसेवक यांच्यासह अजित पवारांच्या जवळचे स्थानिक नेते शरद पवार गटात येणार असल्याची माहिती तुषार कामठे यांनी दिली. २० जुलै रोजी भव्य सभा पिंपरीतील नवमहाराष्ट्र महाविद्यालयात होणार आहे. याच सभेत अजित पवार गटाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नव्वद टक्के माजी नगरसेवक हे शरद पवार गटाच्या संपर्कात असून ते शरद पवार गटात येण्यास इच्छुक आहेत. पैकी एक गट २० जुलै रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात येणार, असेही तुषार कामठे म्हणाले.