चित्रकलेची खासगी प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिक्षकास चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली.निलेश नानासाहेब पवार (वय ४९, रा. भगवतीनगर, सुतारवाडी रस्ता, पाषाण) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत सोळा वर्षीय मुलीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी एका महाविद्यालयात अकरावीत आहे. तिला चित्रकलेची आवड आहे. तिच्या आई-वडिलांनी चित्रकलेच्या प्रशिक्षणासाठी पवार याच्याकडे पाठविले होते.

हेही वाचा >>>पुणे: सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे काढा; ‘एनएचएआय’च्या सूचना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पवार तिला चित्रकलेचे प्रशिक्षण देत होता. पवारने अश्लील चाळे केले. विद्यार्थिनी घरी गेली. तिने आई-वडिलांना या घटनेची माहिती दिली. मुस्कान या संस्थेमार्फत तिने पोलिसांकडे तक्रार दिली.या प्रकरणी विनयभंग तसेच बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनखाली उपनिरीक्षक कपील भालेराव तपास करत आहेत.