पुणे : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने दहावीच्या पुरवणी परीक्षेतील वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.  इतिहास आणि सामाजिक शास्त्र या विषयाची परीक्षा शुक्रवारऐवजी ३ ऑगस्टला होणार असून, उर्वरित वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

हेही वाचा >>> पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक सुरळीत!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. राज्य मंडळातर्फे दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा १८ जुलैपासून सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस पडत आहे. या पूर्वी २० जुलै रोजी होणारी परीक्षाही अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती. त्या दिवशीच्या विषयांची परीक्षा २ ऑगस्ट आणि ११ ऑगस्टला होणार असल्याचे राज्य मंडळाने जाहीर केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे वेळापत्रकात बदल करावा लागला असून, शुक्रवारची नियोजित परीक्षा ३ ऑगस्टला घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.