पुणे :‘दुचाकी वितरकांनी वाहनविक्री करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ग्राहकाला दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे. अन्यथा, वितरकांवर कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) शुक्रवारी पत्रकाद्वारे दिला.

दुचाकी वाहन खरेदी केल्यानंतर संबंधित खरेदीदाराला दोन हेल्मेट द्यावेत, अशी तरतूद मोटर वाहन कायद्यात आहे. वाहनचालकाला हेल्मेट न दिल्यास कारवाई करण्याचीही तरतूद आहे. राज्यातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयानेदेखील याबाबत आदेश दिले आहेत. मात्र, नागरिकांमध्ये याबाबत आवश्यक ती जनजागृती नसल्याचे दिसून येते. दुचाकींच्या अपघातात बहुतांश वेळा हेल्मेट नसल्याने दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागल्याचे आढळते. त्यामुळे हेल्मेटबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

हेही वाचा…पिंपरी-चिंचवड: काय सांगता? पिझ्झा मध्ये आढळला चाकूचा तुकडा, आधी डॉमिनोज च्या मॅनेजर ने केली होती टाळाटाळ नंतर केलं मान्य

राज्य परिवहन विभागाने यापूर्वीच दुचाकी उत्पादक आणि विक्रेत्यांना सूचना दिल्या आहेत. तसेच, राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना याबाबत पत्राद्वारे कळविण्यात आले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले. त्या पार्श्वभूमीवर पुणे ‘आरटीओ’ने कार्यालयाने याबाबत परिपत्रक जारी केले असून, दुचाकी वाहन खरेदीदाराला दोन हेल्मेट द्यावे, अशा सूचना सर्व वाहन वितरकांना केल्या आहेत. हेल्मेट न दिल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

हेही वाचा…गांजा बाळगणाऱ्या दोघांना पकडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहन वितरकांनी दुचाकी खरेदीदाराला दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे. ग्राहकाला हेल्मेट न दिल्यास ग्राहकांनी तक्रार करावी. वितरकावर कारवाई करण्यात येईल. स्वप्नील भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे