जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं खासदार सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे यांच्यासह दर्शन घेतलं. पिंपरी- चिंचवड शहरातील दापोडीत पालखीचा हा शेवटचा विसावा असून यानंतर तुकोबांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ होईल. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालखीची संगमवाडी या ठिकाणी भेट होईल. दोन दिवस दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी असतील.

हेही वाचा – कोणत्याही खासदाराला पुन्हा निवडणुका नको वाटतात – शरद पवार

हेही वाचा – पालखी सोहळा, वाहतूक बदल, पर्यायी मार्गांची माहिती घ्या एका ‘क्लिक’वर…पुणे पोलिसांकडून यंदा ‘गुगल मॅप’चा वापर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य सरकारवर सडकून टीका

खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. विधानसभा तोंडावर आल्यामुळे राज्य सरकारला लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागले. सध्या जुमल्यांचा पाऊस पडतोय. मागील सव्वावर्षापासून राज्याच्या गृह विभागाचा कारभार बिघडला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पुण्यातील पोर्षे कार अपघात प्रकरणात बरेच घोळ झाल्याचे आपण बघितलं. बीडमधील तणावग्रस्त परिस्थिती हे गृह विभागाचे अपयश असल्याचे सांगत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली.