पिंपरी : महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या ४० आमदारांना प्रत्येकी ५० काेटी रुपये दिले, असे दाेन हजार काेटी रुपये खर्च करून सरकार पाडले. असे असताना दाेन पक्ष फाेडून आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. दाेन पक्ष फाेडल्याचा कसला अभिमान बाळगता, असा सवाल राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. पुण्यातील वर्तुळाकार मार्गासाठी (रिंगरोड) वाढीव २० हजार काेटी रुपये काेणाच्या घशात गेले, हे जनतेला कळले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

महाविकास आघाडीचे भोसरीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ मोशीत आयोजित महिला मेळाव्यात खासदार सुळे बोलत होत्या. माजी आमदार विलास लांडे, प्रकाश म्हस्के, शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी महापौर मोहिनी लांडे, सुलभा उबाळे यावेळी उपस्थित होते.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा – पतीच्या छळामुळे दोन महिलांची आत्महत्या; कोंढवा, विमानतळ पोलिसांकडून गुन्हे दाखल

पुणे जिल्ह्यातील वर्तुळाकार मार्गाला आमचा विराेध नाही. त्यातील भ्रष्टाचाराला विरोध आहे. वर्तुळाकार मार्गाच्या कामाचा मूळ खर्च १८ हजार काेटी रुपये हाेता. त्यामध्ये २० हजार काेटींची वाढ केली. त्यामुळे वर्तुळाकार मार्गाचा खर्च ३८ हजार काेटींवर गेला आहे. वाढीव २० हजार काेटी रुपये काेणाच्या घशात गेले, हे आम्हाला कळले पाहिजे. या कामातील भ्रष्टाचार बाहेर काढला जाईल. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या कामाचा कंत्राटदार बदलण्यात येईल असे सांगून खासदार सुळे म्हणाल्या, की आमचा संघर्ष वैयक्तिक नाही. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि अदृश्य शक्तीविराेधात आमची लढाई आहे.

लाेकसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण सरकारला आठवली नाही, त्याचा मी अनुभव घेत आहे. लाेकसभेला दणका बसल्यानंतर लाडकी बहीण आठवली. भाजप खासदार दुसऱ्या पक्षाच्या सभेला गेल्यास पैसे वसूल केले जातील, अशा धमक्या महिलांना देताे. हे काय यांच्या घरातले पैसे देत आहेत का, कारवाईपासून वाचण्यासाठीच अजित पवार आणि त्यांच्यासाेबतचे आमदार भाजपबराेबर गेले आहेत. भाजपबराेबर गेल्यापासून त्यांना शांत झाेप लागते. ‘ईडी’ची धाड टाकायची आणि पक्षात घ्यायचे. हे भाजपचे राजकारण सुरू आहे. पळपुटे पळून गेले, मात्र, आम्ही माेडू पण दिल्लीच्या तख्तासमोर वाकणार नाही, झुकणार नसल्याचेही सुळे म्हणाल्या.

हेही वाचा – विचार करण्याची हीच ती वेळ…

पक्षाचे निर्णय अजित पवारच घेत हाेते

अजित पवारांना नेते केले नसल्यामुळे राष्ट्रवादीत फुट पडल्याच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आराेपाबाबत बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, अजित पवारांची ३० आणि माजी राजकारणातील १८ वर्षे पहावीत, दाेघांना पक्षात काय मिळाले, याचा हिशाेब करावा. मी लाेकसभेच्या उमेदवारीशिवाय पक्षाकडे काही मागितले नाही. पक्षाचे निर्णय काेण घ्यायचे हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे शहा यांच्या आराेपाला काही अर्थ नाही, असेही सुळे म्हणाल्या.

धमक्यांचा काळ गेला

भाेसरीचे भाजपचे उमेदवार २० तारखेनंतर आपले खरे रूप दाखविण्याची धमकी देत आहेत. त्यांनी एका व्यक्तीला जरी धमकी द्यावी, भिती दाखवावी. महिला लाटणे घेऊन मागे लागतील. धमक्यांचा काळ आता गेला. ते जेवढ्या धमक्या देतील, तेवढी गव्हाणे यांची मते वाढतील, असेही सुळे म्हणाल्या.

Story img Loader