पुणे : शहरातील रास्ता पेठेतील महावितरण कार्यालयामध्ये शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या अधिकारी वर्गासोबत नियोजित बैठकीसाठी आल्या होत्या.

त्यावेळी एका आजींनी सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. प्रेक्षकांना भेडसावणाऱ्या एका वेगळ्याच समस्येची तक्रार त्यांनी केली. सोशल मिडीयावर सुप्रिया सुळे आणि या आजींच्या भेटीची चर्चा चांगलीच रंगली आहे. माझा मुलगा आणि सून कामाला जातात. मी घरी असल्याने टीव्हीवर सिरियल बघत असते. एक सिरियल ३० मिनिटाची असते. पण त्यामध्ये जवळपास २० मिनिटाच्या जाहिरातीच असतात.

आम्ही काय जाहिरात पाहण्यासाठी पैसे भरतो का ? ताई यावर तुम्ही काही तरी करा अशी मागणी आजींनी सुप्रिया सुळे यांच्याकडे केली.

या भेटीदरम्यान, आजींनी केलेल्या मागणीने सुप्रिया सुळे यांना देखील हसू अनावर झाले आहे. “टीव्ही सिरियलपेक्षा जाहिरातीच जास्त येतात, यावर काहीतरी करा” असं म्हणताच सुळेही हसू आवरू शकल्या नाहीत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.आज्जींच्या या थेट आणि विनोदी शैलीतील तक्रारीमुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.