scorecardresearch

Premium

देखावे पाहण्यासाठी आजपासून गर्दी; पुण्यातील ‘हे’ प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर होणार बंद

लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता वाहतुकीस बंद केले जाणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

ganeshotsav 2023 pune, pune ganeshotsav 2023, major roads closed in pune after 5 pm
देखावे पाहण्यासाठी आजपासून गर्दी; पुण्यातील 'हे' प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर होणार बंद (संग्रहित छायाचित्र)

पुणे : घरगुती गणपती, तसेच गौरी विसर्जनानंतर शनिवारपासून (२३ सप्टेंबर ) देखावे पाहण्यासाठी गर्दी होणार असल्याने शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत. लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता वाहतुकीस बंद केले जाणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. घरगुती गणपती आणि गौरी विसर्जनानंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींच्या दर्शनासाठी आणि देखावे पाहण्यास गर्दी होते.

शनिवारपासून शहराच्या मध्यभागात गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. २७ सप्टेंबरपर्यंत अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता अन्य सर्व वाहनांसाठी सायंकाळी पाचनंतर मध्यभागातील प्रमुख रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. गर्दी ओसरेपर्यंत मुख्य रस्ते बंद असतील. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

pune recorded high decibel sound during ganesh immersion procession
पुणे: विसर्जन मार्गावर दणदणाट…स्पीकर, ढोल ताशांचा आवाज मर्यादेबाहेर
Aurangabad National Highway
नागपूर – औरंगाबाद महामार्गाने प्रवास करण्यापूर्वी ही बातमी वाचा…
shiva bhakta killed in truck accident
काळाचा घाला… कावडधारी शिवभक्ताचा ट्रकच्या धडकेत मृत्यू
Kharpada and Kashedi
गणेश उत्सव २०२३ : कोकणात खारपाडा ते कशेडी मार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची जय्यत तयारी, प्रत्येक पाच किलोमीटरवर…

हेही वाचा : पावसाळापूर्व कामे केल्याचा महापालिकेचा दावा फोल; पुण्यातील रस्ते जलमय

वाहतुकीस बंद असणारे रस्ते पुढीलप्रमाणे- लक्ष्मी रस्ता (हमजेखान चौक ते टिळक चौक), शिवाजी रस्ता (गाडगीळ पुतळा चौक ते देशभक्त केशवराव जेधे चौक, स्वारगेट), बाजीराव रस्ता (पूरम चौक ते अप्पा बळवंत चौक), टिळक रस्ता (मराठा चेंबर ऑफ काॅमर्स ते हिराबाग चौक)

वाहतुकीस बंद असणारे अंतर्गत रस्ते पुढीलप्रमाणे- सिंहगड गॅरेज (घोरपडे पेठ ते राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक), दिनकरराव जवळकर चौक ते पायगुडे चौक ते हिराबाग चौक, कै. अनंत बाळकृष्ण नाईक पथ ते टिळक रस्ता, सणस रस्ता (गोटीराम भैय्या चौक, मंडई ते गोविंद हलवाई चौक), पानघंटी चौक ते गंज पेठ पोलीस चौकी, गंज पेठ ते वीर लहुजी वस्ताद तालीम चौक, गायकसाब मशीद ते सेंटर स्ट्रीट पोलीस चौकी (लष्कर), कोहिनूर चौक ते बाबाजान चौक (लष्कर), जेधे प्रासाद रस्ता, सुभानशाह दर्गा, पार्श्वनाथ चौक, शास्त्री चौक ते सोन्या मारुती चौक, गुरुनानक पथ ते हमजेखान चौक (देवजीबाबा चौक, गणेश पेठ).

हेही वाचा : पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरून राजकारण…’या’ राजकीय नेत्यांचा अडथळा

वाहने लावण्यास मनाई

शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते मंडई, मंडई ते शनिपार, शनिपार ते फुटका बुरूज, अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक या भागात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pune major roads closed after 5 pm due to the crowd to watch the ganeshotsav scenes at ganesh mandals pune print news rbk 25 css

First published on: 23-09-2023 at 10:59 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×