शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी करणी सेनेने कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलंय. “करणी सेनेसारख्या चिल्लर सेनेबाबत मला काही बोलायचं नाही. या मागील बोलविते धनी आरएसएस आणि सरकारमध्ये बसलेली भाजपा आहे,” असा आरोप सुषमा अंधारेंनी केला. त्या रविवारी (१ जानेवारी) कोरगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आल्या असताना माध्यमांशी बोलत होत्या.

कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. शौर्यदिनाचे यंदाचे २०५ वे वर्ष असून विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून हजारोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी कोरेगाव भीमा येथे दाखल झाले आहेत.

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
deputy leader of Shiv Sena Thackeray group Sushma Andhare criticized BJP
‘‘…हा तर भाजपाचा डीएनए, आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही” सुषमा अंधारे यांची टीका, म्हणाल्या…
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप

“करणी सेनेमागील मागील बोलविते धनी आरएसएस आणि भाजपा”

करणी सेनेबाबत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “करणी सेनेसारख्या चिल्लर सेनेबाबत मला काही बोलायचं नाही. या मागील बोलविते धनी आरएसएस आणि सरकारमध्ये बसलेली भाजपा आहे. या भाजपामधील एखाद्या जबाबदार प्रतिनिधीने करणी सेनेची भूमिका बोलवून दाखवावी. त्यावेळी आंबेडकरी जनता काय आहे हे दाखवलं जाईल.”

“सरकारच पेशवाईचं असेल, तर आम्ही कशी अपेक्षा करावी”

अभिवादन करण्यास राज्य सरकारमधील मंत्री आले नाही. त्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, “सरकारमधील मंत्री येणं, अपेक्षित नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वात प्रथम पालकमंत्री म्हणून अजित पवार अभिवादन करीत असत. पण आताचं सरकारच पेशवाईचं असेल, तर या पेशवाईकडून आम्ही कशी अपेक्षा करावी.”

“पेशवाईचा वसा आणि वारसा चालविणारे लोक या सरकारमध्ये”

“ज्या पेशवाईचा पाडाव म्हणून हा विजय स्तंभ उभारला गेला आहे, त्या पेशवाईचा वसा आणि वारसा चालविणारे लोक या सरकारमध्ये असतील, तर या ठिकाणी अभिवादन करण्याची अपेक्षा फोल ठरेल,” अशा शब्दात भाजप सरकारवर सडकून त्यांनी टीका केली.

“त्यामुळे दरवर्षी भीमा कोरेगाव येथे येण्यापासून मज्जाव करण्यात आला”

सुषमा अंधारे म्हणाल्या, “कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगली प्रकरणी दरवर्षी माझ्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत होती. त्यामुळे दरवर्षी भीमा कोरेगाव येथे येण्यापासून मज्जाव करण्यात आला. मात्र, मी कायद्याचं पालन करणारी आहे. जर कायद्याने प्रतिबंधात्मक कारवाई केली असेल, तर मी येऊ नये, या मताची मी आहे.”

हेही वाचा : VIDEO: “तुम्ही पैसे घेऊन ‘पेड’ कार्यक्रम करता”, आरोपावर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या, “मी जे…”

“त्यामुळे मी आज अभिवादन करण्यासाठी आले”

“यंदाच्या वर्षी माझ्यावर कोणत्याही प्रकारची प्रतिबंधात्मक कारवाई नाही. त्यामुळे मी आज अभिवादन करण्यासाठी आली आहे. त्या गोष्टीचा मला खूप आनंद होत आहे. या ठिकाणावरून आम्ही ऊर्जा घेऊन जाणार आहोत आणि जातीवाद, विषमतावाद, अन्याय, अत्याचार या विरोधात लढण्यासाठी आम्ही तयार आहेत,” अशी भावना सुषमा अंधारेंनी व्यक्त केली.