मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून शुक्रवारी जल्लोष करण्यात आला. पुण्यातील सारसबाग परिसरातील बाळासाहेब ठाकरे स्मारकाला पुष्पहार अर्पण करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी महालक्ष्मी मंदिरात आरती केली. पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याबरोबरच ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनीही फटाक्यांची आतषबाजी करत निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत केलं. दरम्यान, शिंदे गटाच्या जल्लोषावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खोचक टीका केली आहे. पुण्यात माध्यामांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ‘शिवसेना भवन’ शिंदे गटाच्या ताब्यात जाणार? संजय राऊत म्हणाले, “आयोगाने शेण खाल्लं म्हणून…”

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

“कालचं शिंदे गटाचा जल्लोष म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाटणारी माणसं असतात, त्याप्रकारचं तो जल्लोष होता. कारण भक्तगणांना हे कळत नाही की भाजपाने शिवसेनेचं किती नुकसान केलंच आहे. त्यापेक्षाही एकनाथ शिंदेंची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी काल शेवटचा घाव घातला आहे. याचं उत्तर जनता मतपत्रिकेतून देईल आणि भाजपासह शिंदे गटाच्या ४० आमदारांना सत्तेतून पायउतार केल्याशिवाय राहणार नाही”, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

हेही वाचा – “पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा…”, संजय राऊतांचा हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे लोक सत्तातूर, फितूर अन् बदमाश

“प्रतिकांचं राजकारण महत्त्वाचं असलं, तरी प्रतिकांच्या राजकारणावर मुल्याधिष्ठीत राजकारण असतं, जे प्रत्येक शिवसैनिकांच्या ठायी आहे. या शिवसैनिकांची भावनिक नाळ ही मातोश्री, सेनाभवन आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावांशी जोडली गेली आहे. जर एकनाथ शिंदे म्हणत असतील, की ते बाळासाहेबांच्या विचारावर चालत आहेत, तर बाळासाहेबांचा शेवटचा शब्द होता, की माझ्यानंतर उद्धव आणि आदित्यला सांभाळा, याचाच अर्थ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची नेतृत्व म्हणून स्वत: बाळासाहेबांनी निवड केली होती. बाळासाहेबांचा हाच शब्द जर हे लोक पाळू शकत नसतील, तर हे लोक किती सत्तातूर, फितूर आणि बदमाश असतील, हे कळतं”, असेही त्या म्हणाल्या.