पुणे : नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, अशी महाविकास आघाडीकडे मागणी करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोड यांचा राजीनामा का घेतला नाही. मलिक अल्पसंख्यांक असल्यामुळे फडणवीस यांची भूमिका बदलली का, अशी विचारणा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी येथे शुक्रवारी केली.

भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला समर्थन दिल्याचे विधिमंडळाच्या अधिवेशनात दिसून आले होते. त्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटले. त्यानंतर सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. त्यामुळे महायुतीमध्ये मलिक नकोत, असे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना दिले. या पार्श्वभूमीवर अंधारे यांनी पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीस यांना उशिरा विवेकवाद कसा आठवला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – बुलढाणा : पँथर सेना चढली टाकीवर! रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार आणि नवाब मलिक यांच्यामध्ये दोन ते तीन भेटी झाल्या होत्या. मात्र मलिक यांचा विषय काढण्यामागील राजकारण वेगळे आहे. अधिवेशनात मराठा आरक्षण, धनगर आरक्षणावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे. मात्र मलिक प्रकरणावर पुढील तीन ते चार दिवस चर्चा होईल. सत्तेपेक्षा देश मोठा, हा विवेकवाद फडणवीस यांना उशिरा सुचला आहे. भावना गवळी, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रिफ यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही. तरीही ते सत्तेत महत्त्वाच्या पदावर आहेत. मनोज कंबोजसारखी व्यक्ती पुढे केली जाते. त्यावेळी फडणवीस यांचा विवेकवाद कुठे जातो, अशी टीका अंधारे यांनी केली.

हेही वाचा – भंडारा : अवकाळीग्रस्तांच्या भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार… राज्यपालांची ग्वाही

ससूनमधील अमली पदार्थ तस्करी प्रकरणी काहींना अटक झाली आहे. कारागृहातून या अवैध कृतीला बळ दिले जात होते. त्यामुळे कारागृह निरीक्षक, महानिरीक्षक यांच्यावर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली