पिंपळे गुरव येथील विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यूनंतर नातेवाईकांनी तिचा मृतदेह बुधवारी सांगवी पोलीस ठाण्याबाहेर आणून ठेवून आंदोलन केले. महिलेचा पती आणि सासऱयांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तिच्या नातेवाईकांनी केली. स्नेहल क्षीरसागर (वय २१, रा.पिंपळे गुरव) असे या महिलेचे नाव आहे.
स्नेहल यांचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांचे पती महापालिकेत कामाला आहेत. स्नेहल यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगत तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी या प्रकरणी पती आणि सासऱय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलीसांनी त्या दोघांना अटक करावी, या मागणीसाठी स्नेहल यांच्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह सांगवी पोलीस ठाण्याबाहेर आणून ठेवला.