पिंपरी : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन मोटारींना ठोकर दिली. ही घटना शनिवारी (१ जून ) सायंकाळी पाचच्या सुमारास शांताई सिटी सेंटरसमोर घडली. दरम्यान, मुख्याधिका-यांनी मद्यपान केल्याचा आरोप असून त्यांना रक्ताचे नमुने तपासण्यासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा >>> दोन दिवसांत उष्णतेची लाट कमी होणार; नैऋत्य मोसमी वारे केरळात अडखळले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत सिद्धराम इरप्पा लोणीकर ( वय ३७, रा. नढेनगर, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुख्याधिकारी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकर हे तळेगाव दाभाडे येथील कोटक बँकेत काही कामासाठी आले होते. त्यांनी त्यांची वोल्वो कार रस्त्याच्या कडेला उभी केली होती. स्टेशन चौकाकडून मुख्याधिकारी पाटील हे खासगी स्कॉर्पिओ मोटारीने भरधाव वेगाने आले. त्यांनी पाठीमागून वोल्वो कारला धडक दिली. वोल्वोच्या समोर उभी असलेल्या ब्रेझा मोटारीलाही टोकर बसली. यात दोन्ही मोटारींचे नुकसान झाले आहे. त्यावेळी मोटारीत कोणीही नव्हते. पाटील यांनी मद्यपान केल्याची लोणीकर यांची तक्रार आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुख्याधिकारी पाटील यांना वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. मद्यपान चाचणी करण्यासाठी पिंपरीतील वायसीएमएच रुग्णालयात नेण्यात आले आहे.