पिंपरी- चिंचवड: भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचा दीनानाथ रुग्णालयाच्या हलगर्जीपणाने मृत्यू झाल्याचा आरोप होता. या प्रकरणी डॉ. घैसास यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, तनिषा यांच्या जुळ्या मुलींच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून २४ लाख रुपये सूर्या हॉस्पिटलच्या बँक खात्यात पाठवण्यात आले आहेत.
भाजप आमदार अमित गोरखे यांनी पहिल्या दिवसांपासून या प्रकरणी पाठपुरावा केला होता. हे प्रकरण गंभीर असल्याने यावर सरकार ने देखील तातडीने पाऊले उचलली. या प्रकरणी राजकारण देखील तापलं होत. अखेर या प्रकरणी वेगवेगळ्या समिती गठीत करण्यात आल्या होत्या. दीनानाथ रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनीषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता. अखेर या प्रकरणात डॉ. घैसास यांच्यावर ठपका ठेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. विधी व न्याय विभागाने केलेल्या चौकशीनंतर दीनानाथ रुग्णालयाला दहा लाखांचा दंड करण्यात आला होता. अखेर या प्रकरणी गर्भवती माता तनिषा भिसे यांच्या मृत्यू पश्चात मुलींच्या उपचाराच्या खर्चासाठी प्रशासनाने २४ लाख रुपये सूर्या रुग्णालयाच्या बँक खात्यात पाठवण्यात आले आहेत.