पुणे : महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या ३२ गावातील नागरिकांनी महापालिकेकडे मिळकतकरापोटी २३२ कोटी ७० लाख रुपयांचा महसूल जमा केला आहे. या गावातील नागरिकांना महापालिकेने मिळकतकरांच्या बिलांचे वाटप न करताही येथील १ लाख ३६ हजार २१५ मिळकतदारांनी महापालिकेच्या तिजोरी हा भरणा केला आहे.

महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या ३२ गावांतील मिळकतकराचा प्रश्न अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. या गावांतील मिळकतदारांकडून कर आकारण्यास राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे महापालिकेच्या मिळकतकर विभागाने या गावांतील नागरिकांना मिळकतकराच्या बिलांचे वाटप केले नाही. मात्र, तरीही अनेक मिळकतदारांनी ऑनलाईन पद्धतीने ही बिले भरली आहेत.

महापालिकेच्या मिळकतकराला राज्य सरकारने स्थगिती दिली असली तरी महापालिकेचा मिळकतकर भरावाच लागणार आहे, याची कल्पना या गावातील नागरिकांना आहे. त्यामुळे महापालिकेने बिले दिली नसतानाही ऑनलाईनचा वापर करून नागरिकांनी पाच ते दहा टक्के सवलतीचा फायदा घेऊन १ लाख ३६ हजार २१५ मिळकतदारांनी सुमारे २३२ कोटी ७० लाख रुपयांचा कर महापालिकेकडे भरला आहे.

समाविष्ट गावातील एकूण मिळकती : ४ लाख १७ हजार ७००

– ३ लाख १४ हजार ७८२ मिळकदारांकडे असलेली थकबाकी : २ हजार कोटी ४१ लाख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– व्यावसायिक मिळकती : २६ हजार ३५० – व्यावसायिक मिळकतींची थकबाकी : ६३२ कोटी