अल्पवयीन मुलावर लैंंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने एकाला दहा वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांनी यांनी याबाबतचे आदेश दिले.

हेही वाचा- ‘पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करा,’ अमोल मिटकरींची मागणी; हिंदू महासंघाचा विरोध!

याबाबत पीडित मुलाच्या आईने फिर्याद दिली होती. पीडित मुलाचे वय नऊ वर्षे असून त्याचे वडील डाॅक्टर आहेत. आरोपी त्याच्या वडिलांच्या क्लिनिकमध्ये कामगार होता. पीडित मुलगा वडिलांच्या क्लिनिकवर जायचा. आरोपीने मुलाशी जवळीक साधून त्याचावर अनैसर्गिक अत्याचार केला. या प्रकाराची अन्य कोणाला माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मुलगा घाबरला होता. आईने त्याची चौकशी केली. तेव्हा क्लिनिकमधील कामगाराने अत्याचार केल्याची माहिती त्याने दिली. त्यानंतर मुलाच्या आईने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणात पोलिसानी तपास करुन आरोपीच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील ॲड. अरुंधती ब्रह्मे यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. पीडित मुलगा, वैद्यकीय तज्ज्ञ आणि तपास अधिकाऱ्यांची साक्ष महत्वाची ठरली.

हेही वाचा- पुण्यात १२ वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीचा शोध सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणाचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक अनुराधा भोसले यांनी केला. न्यायालयीन कामकाजात पाेलीस कर्मचारी निलेश पुकाळे, के. आर. रेणुसे यांनी सहाय केले.