शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिनिमित्त सणस मैदानासमोर प्रस्तावित करण्यात आलेल्या कलादालनाची निविदा मंगळवारी स्थायी समितीने एकमताने मंजूर केली. या कलादालनासाठी एक कोटी ८५ लाख रुपये खर्च येणार असून येत्या आठ महिन्यांत हे काम पूर्ण होईल.
शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे आणि महापालिकेतील गटनेता अशोक हरणावळ यांनी ही माहिती मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. कलादालन आणि व्यंगचित्रकलेचे दालन म्हणून शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभे करावे, अशी सूचना सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली होती. त्यानुसार सणस मैदानासमोरील जागेत हे भव्य कलादालन उभे केले जाणार असून त्यासाठी आठ हजार ६०० चौरसफुटांचे बांधकाम केले जाईल.
स्मारकाच्या तळमजल्यावर पार्किंग आणि विविध प्रकारातील सुशोभन प्रस्तावित आहे. पहिल्या मजल्यावर अकराशे चौरसफुटांचे कलादालन होणार असून त्यात ठाकरे यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांचे कायमस्वरूपी कलादालन असेल. तसेच चौदाशे चौरसफुटांचे आणखी एक कलादालनही स्मारकामध्ये बांधले जाणार असून हे कलादालन चित्रकार, व्यंगचित्रकारांच्या प्रदर्शनासाठी खुले असेल. शिवसेनाप्रमुखांच्या विविध कार्यक्रमांची छायाचित्रे ज्या पुणेकरांकडे असतील, त्यांनी ती या कलादालनासाठी पाठवावीत, असेही आवाहन शिवसेनेच्या वतीने डॉ. गोऱ्हे यांनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th May 2013 रोजी प्रकाशित
बाळासाहेब ठाकरे कलादालनाची निविदा स्थायी समितीमध्ये मंजूर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिनिमित्त सणस मैदानासमोर प्रस्तावित करण्यात आलेल्या कलादालनाची निविदा मंगळवारी स्थायी समितीने एकमताने मंजूर केली.
First published on: 08-05-2013 at 02:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tender for balasaheb thackrey art gallery approved in standing comm