करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्य मंडळाकडून सुधारित वेळापत्रक पुढील काही दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. मात्र परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांना नियमित आणि पुरवणी परीक्षेसह अतिरिक्त संधी देण्यासाठीची विशेष परीक्षा आता घेता येणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. शैक्षणिक वेळापत्रक सुरळीत ठेवण्यासाठी दरवर्षीप्रमाणेच नियमित आणि पुरवणी परीक्षा याच दोन परीक्षा घेतल्या जातील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य मंडळातर्फे  राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेतल्या जाणार आहेत. राज्य मंडळाने जाहीर के लेल्या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत, तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार होती. मात्र करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर के ला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tenth twelfth grade students no longer have the opportunity to take special exams abn
First published on: 16-04-2021 at 00:34 IST