scorecardresearch

पुणे: येरवड्यात कोयता गॅंगची दहशत, तरुणावर वार; चार अल्पवयीन मुले ताब्यात

फुटबाॅल खेळताना झालेल्या वादातून अल्पवयीन मुलांनी तरुणावर कोयत्याने वार करुन बेदम मारहाण केल्याची घटना येरवडा भागात घडली.

crime news
पुणे: येरवड्यात कोयता गॅंगची दहशत, तरुणावर वार; चार अल्पवयीन मुले ताब्यात (प्रातिनिधिक छायाचित्र)

 फुटबाॅल खेळताना झालेल्या वादातून अल्पवयीन मुलांनी तरुणावर कोयत्याने वार करुन बेदम मारहाण केल्याची घटना येरवडा भागात घडली. अल्पवयीन मुलांनी कोयते उगारुन परिसरात दहशत माजविली. मुलांनी दोन रिक्षांच्या काचा फोडल्या.या प्रकरणी चार अल्पवयीन मुलांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल अमीरउल्ला खान (वय १९, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याने या संदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुले आणि खान एकाच भागात राहायला आहेत. फुटबाॅल खेळताना अल्पवयीन मुले आणि खान यांच्यात वाद झाला होता.

हेही वाचा >>>कच्च्या मालाचा तुटवडा; पोहे महागले

खान, त्याचे मित्र, महेश मिश्रा, आयुष दुचाकीवरुन येरवडा भागातून निघाले होते.त्या वेळी अल्पवयीन मुलांनी दुचाकीस्वार खानला अडवले. त्याच्यावर कोयत्याने वार केला. खान याचा मित्र मिश्राला बांबुने मारहाण केली. परिसरात दहशत माजवून दोन रिक्षांच्या काचा फोडल्या. पसार झालेल्या मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 10:21 IST