पुणे शहरात डबल डेकर बस सुरू करण्याबाबतची चाचपणी पीएमपी प्रशासनाकडून सुरू झाली आहे. त्यासंदर्भात प्राथमिक चर्चा पीएमपीच्या बैठकीत करण्यात आली. मात्र अद्यापही डबल डेकर बस घेण्याबाबतचा कोणताही निर्णय झालेला नाही, असे पीएमपीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा- पुणे : सिंहगड घाट रस्त्यावर विविध उपाययोजना प्रस्तावित

शहरातील वाहतूक कोंडीची समस्या बिकट झाली असून पीएमपी या सार्वजनिक सेवेच्या सक्षमीकरणाची मागणी होत आहे. प्रवाशांना उत्तम प्रतीची सेवा देण्यासाठी पीएमपीकडून विविध उपाययोजनांवर विचार सुरू आहे. त्याअंतर्गत डबल डेकर बसच्या पर्यायाची चाचपणी पीएमपीच्या वाहतूक विभागाकडून सुरू झाली आहे.

हेही वाचा- पुणे : करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी प्रशासन सज्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डबल डेकर बस पुण्यात सुरू करण्याबाबत प्राथमिक चर्चा झालेली आहे. मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यासंदर्भात मुंबईतील बेस्टबरोबर चर्चा करण्यात येईल. डबल डेकर बसच्या उपयुक्ततेचा अभ्यास केल्यानंतर आणि त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितले.