महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २०२१ घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल ३.७० टक्के लागला. परीक्षा दिलेल्या एकूण ४ लाख ६८ हजार ६७९ उमेदवारांपैकी १७ हजार ३२२ उमेदवार पात्र ठरले आहेत.

हेही वाचा- पुणे: लाल महाल ते पानिपत दुचाकी मोहीम; सशक्त भारत समूहातर्फे पानिपत गौरवगाथा जागर अभियान

How many applications filed under RTE only two days left to fill the application
आरटीई अंतर्गत किती अर्ज दाखल? अर्ज भरण्यासाठी राहिले दोनच दिवस!
UPSC Releases Exam Schedule for 2025, Registration Dates and Exam Details Announced, upsc exams 2025, upsc exms 2025 exam schedule, Union Public Service Commission, Competitive Examination, marathi news, students, maharashtra students
पुढील वर्षीच्या विविध स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक UPSC कडून जाहीर; नागरी सेवा परीक्षा कधी होणार?
Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
How many candidates appeared in the last offline set exam The set will be held twice a year
शेवटच्या ऑफलाइन सेट परीक्षेला किती उमेदवारांची उपस्थिती? सेट वर्षातून दोनवेळा होणार?

राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य परीक्षा परिषदेने २१ नोव्हेंबर २०२१ रोजी टीईटी घेतली होती. त्यात पहिली ते पाचवीसाठीचा पेपर एक दिलेल्या २ लाख ५४ हजार ४२७ उमेदवारांपैकी ९ हजार ६७४ उमेदवार पात्र झाले. या गटाच्या पात्रतेची टक्केवारी ३.८० आहे. ६४ हजार ६४७ उमेदवारांनी सहावी ते आठवीसाठी गणित, विज्ञानाच्या पेपर दोन दिला होता. त्यातील केवळ १.४५ टक्के, म्हणजेच ९३७ उमेदवार पात्र झाले. तर सहावी ते आठवीच्या सामाजिक शास्त्रचा पेपर दोन १ लाख ४९ हजार ६०४ उमेदवारांनी दिला होता. त्यातील ६ हजार ७११ (४.४९ टक्के) उमेदवार उत्तीर्ण पात्र ठरले. पात्र ठरलेल्या उमेदवारांना संबंधित शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांच्यामार्फत प्रमाणपत्र पाठवण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा- पुणे: ‘ॲकॅडमिक क्रेडिट बँक’साठी साडेचार लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; प्र-कुलगुरू संजीव सोनवणे यांची माहिती

शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली टीईटी परीक्षा गेल्यावर्षी चर्चेत आली. राज्य परीक्षा परिषदेने २०१८ आणि २०१९मध्ये घेतलेल्या टीईटी परीक्षेतील गैरप्रकार गेल्या वर्षी उघडकीस आला होता. या प्रकरणी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. २०१८च्या परीक्षेत १ हजार ६६३ उमेदवारांनी, तर २०१९च्या परीक्षेत ७ हजार ८७४ उमेदवार असे साडेनऊ हजारांपेक्षा जास्त उमेदवारांनी परीक्षेत गैरप्रकार केल्याचे स्पष्ट झाले. परीक्षा परिषदेने संबंधित उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून त्यांची संपादणूक रद्द करण्याची कारवाई केली आहे.