लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: टेम्पोसह चालक विहीरीत पडल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीत पडलेल्या टेम्पोचालकाची सुटका केली. जवानांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतल्याने अनर्थ टळला.

विनोद पवार (वय ३५) असे बचावलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे.कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात पुरंदर वॉशिंग सेंटरजवळ एक जण टेम्पोसह विहिरीत पडल्याची माहिती अग्निशमन दलाच्या कात्रज केंद्राला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख संजय रामटेके, बंडू गोगावले, वसंत भिलारे, किरण पाटील, शुभम शिर्के, संकेत शेलार, धीरज जगताप यांनी तेथे धाव घेतली. विहीरीत दोर सोडण्यात आला. विहीरीत पडलेल्या टेम्पोचालकाशी जवानांनी संवाद साधून त्याला धीर दिला.

आणखी वाचा-पुणे: व्याजाने दिलेले पैसे परत करण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याने तरुणाची आत्महत्या; हडपसरमधील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जवान विहीरीत उतरले. दोराच्या सहायाने विहिरीत पडलेल्या टेम्पोचालकाला बाहेर काढण्यात आले. टेम्पोचालक पवार याची चौकशी करण्यात आली. तेव्हा टेम्पो वॉशिंग सेंटरमध्ये आणण्यात आला होता. टेम्पो मागे घेण्यात येत असताना विहीरीत पडल्याची माहिती पवरा यांनी दिली. पवार यांना किरकोळ दुखापत झाली असून जवानांनी त्वरीत मदत उपलब्ध केल्याने अनर्थ टळला.