पुणे : पुणे शहर पाेलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांना मोफत पीएमपी बस प्रवास बंद करण्यात आला आहे. पीएमपीएल प्रशासनाकडून याबाबतचे आदेश देण्यात आले आहे. या आदेशामुळे पोलिसांना पीएमपी बसमधून प्रवास करण्यासाठी तिकिट काढावे लागणार आहे.

हेही वाचा… संतापजनक! वडील, चुलत्याने केला १७ वर्षीय तरुणीवर बलात्कार; आजोबांकडून विनयभंग

महापालिका परिवहन सेवेच्या म्हणजेच पीएमपीएल बसगाड्यांमधून पोलीस कर्मचारी मोफत प्रवास करतात. या प्रवास खर्चापोटी राज्य सरकारच्या गृहविभागाकडून अनुदान दिले जाते. मार्च १९९१ पासून राज्यभरात मोफत सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, आता शासनाच्या नव्या निर्णयानुसार ही सेवा बंद करण्यात आल्याने पोलिसांना तिकीट काढून प्रवास करावा लागणार आहे. या निर्णयानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळकडून पोलिसांना देण्यात येणारा मोफत प्रवास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन महामंडळातील वाहक, तिकीट तपासणीस, पर्य़वेक्षकीय सेवकांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बसमधून विनातिकीट बस प्रवासाची सुविधा मंगळवारपासून (१५ नोव्हेंबर) बंद करण्यात आली आहे, असे पीएमपीएलचेअध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा… पुणे: उच्च शिक्षण संचालकपदी डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची नेमणूक

मोफत बस प्रवास बंद करण्यामागची कारणे

मोफत प्रवासासाठी पोलीस प्रशासनाकडून पीएमपीएलला देण्यात येणारे अनुदान वेळेवर मिळत नव्हते. अनुदान मिळविण्यासाठी पीएमपीएल प्रशासनाला अनेकदा पत्रव्यवहार करावा लागत होता. लाखो रुपयांचे अनुदान मिळत नसल्याने पीएमपी प्रशानसाला आर्थिक झळ सोसावी लागत होती. मध्यंतरी पीएमपी प्रशासनाने जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात पीएमपी सेवा सुरू केली होती. आर्थिक संकटामुळे पीएमपी प्रशासनाने जिल्ह्यातील पीएमपी सेवा नुकतीच बंद केली.

हेही वाचा… शिवसृष्टी उद्घाटनाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर

पोलीस दलात नाराजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस दलातील अनेक पोलीस कर्मचारी विशेषत: महिला पोलीस पीएमपी बसमधून प्रवास करतात. मोफत पीएमपी प्रवास बंद केल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.