पुणे : गर्भपात करून चार महिन्यांचे अर्भक प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून फेकून दिल्याची घटना येरवडा येथील पांडू लमाण वस्तीत घडली. अनैतिक संबंधातून किंवा मुलगी असल्याचे निदान झाल्याने अर्भक फेकून दिल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस कर्मचारी आनंद मन्हाळकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञाताविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

bombay high court allows woman to abort 27 week pregnancy in private hospital
जिवंत बाळ जन्माला येऊ नये अशा पद्धतीने गर्भपात करण्यास परवानगी, बाळात दोष आढळल्याने याचिकाकर्तीची मागणी
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक

हेही वाचा – पावसाच्या अवकृपेने पश्चिम महाराष्ट्र टँकरग्रस्त… लाखो नागरिकांची पाण्यासाठी वणवण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडू लमाण वस्तीतील शंकर मंदिराच्या कट्ट्यासमोर बुधवारी सकाळी चार महिन्यांचे अर्भक मृत अवस्थेत प्लॅस्टिकच्या पिशवीत फेकलेले आढळून आले. सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अर्भकाची पाहणी करून ससून रुग्णालयात पाठविले. चार महिन्यांचे अर्भक जन्माला येण्यापूर्वी गर्भपात करून फेकून देण्यात आले. अनैतिक संबंधातून किंवा अर्भक मुलगी असल्याचे निदान झाल्याने फेकून देण्यात आले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला आहे.